spot_img
spot_img
spot_img

बिअरच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला; तळवडेतील दोघांवर गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दुचाकी कुठे आहे, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी एका इलेक्ट्रिशियनवर बिअरच्या रिकाम्या बाटल्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना तळवडे येथील कंटेनमेंट एरिया परिसरात घडली.

याप्रकरणी यासिन इद्रिस शेख (वय २३, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, रा. एकता चौक, श्रमिक हाउसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सोन्या वानखेडे (वय अंदाजे २१) आणि ओमकार चव्हाण (वय २१), दोघे रा. रुपीनगर, तळवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १.४५ वाजता माळावर मोकळ्या मैदानात, मोठ्या ज्ञानदीप शाळेजवळ, कंटेनमेंट एरिया येथे फिर्यादी उभे होते. त्यावेळी आरोपींनी ‘तुमची दुचाकी कुठे आहे?’ अशी विचारणा केली. त्यानंतर दोघांनी पाठीमागून येऊन फिर्यादीच्या डोक्यावर व उजव्या कानावर बिअरच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या मारल्या.

या हल्ल्यात डोक्यावर चार आणि उजव्या कानाजवळ तीन टाके लागल्याचे फिर्यादीने सांगितले. आरोपींनी शिवीगाळ करून या भांडणाबाबत कोणाला सांगितल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!