spot_img
spot_img
spot_img

कंपनीतील कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

खालुंब्रे परिसरातील एका कंपनीत काम करताना गंभीर दुखापत होऊन कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी पाच जणांविरोधात उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सचिन रंगनाथ महाडिक (वय ४३, पोलिस उपनिरीक्षक, नेमणूक उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्ह्यात मालक अजय खंडेलवाल, प्लांट हेड अनिल पोपटळाल धारूरकर, कॉन्ट्रॅक्टर अनूप रघुनाथ सूर्यवंशी, एचआर राजेंद्र मोरे आणि पेंट शॉप इन्चार्ज विश्वास शांतिलाल ससाणे यांना आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोजकुमार रामप्रसाद साके हे कंपनीत काम करत असताना त्यांना प्रथम गंभीर दुखापत झाली. त्यांना इंद्रायणी हॉस्पिटल, खालुंब्रे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १.३० वाजता पुढील उपचारासाठी त्यांना डी.वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर पोलिसांना आवश्यक माहिती न दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित कंपनीतील जबाबदार व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!