spot_img
spot_img
spot_img

थेरगावात पैशांच्या वादातून पतीवर चाकूने वार; आरोपी अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेच्या पतीवर चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना थेरगावातील मधुबन कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलिसांनी यल्लालिंग ऊर्फ यल्लाप्पा शिवशरणप्पा आळंदकर (रा. थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता मधुबन कॉलनी, पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे ही घटना घडली. फिर्यादी महिला घरी असताना आरोपी हा तिच्या घरी आला. फिर्यादीच्या पतीशी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पैशांच्या देण्याघेण्याच्या कारणावरून वाद घातला.

या वादातून आरोपीने फिर्यादीचे पती काशीनाथ संभाजी वावळे यांच्यावर चाकूने चार ते पाच वेळा वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!