शबनम न्यूज | प्रतिनिधी
यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे प्रिय भजन ‘रघुपती राघव राजाराम’ सादर केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा देवकाते तसेच संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. त्यांच्या विचारांचा, देशसेवेचा आणि साधेपणाचा परिचय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून करून दिला. सत्य, अहिंसा, स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि देशभक्ती यांसारख्या मूल्यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांच्या विचारांची ओळख होऊन देशसेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळाली. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 238250