शबनम न्यूज | प्रतिनिधी
कुदळवाडी येथील मोरे पाटील चौकात वर्षानुवर्षे कायम असलेल्या खड्ड्याचा निषेध करण्यासाठी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून मारुती गणपत जाधव यांनी खड्ड्यालाच पुष्पहार अर्पण करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
या खड्ड्यामुळे नागरिक व वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून समस्या कायम असूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
“येत्या आठ दिवसांत मोरे पाटील चौकातील रस्त्याची दुरुस्ती करून हा खड्डा कायमस्वरूपी बुजवावा. आठ दिवसांत काम झाले नाही, तर यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा मारुती गणपत जाधव यांनी दिला.
महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





Total Users : 225910