spot_img
spot_img
spot_img

ऑपरेशन सिंदूरचं देशभर कौतुक,पिंपरी चिंचवड मध्ये तिरंगा रॅली

पिंपरी चिंचवड :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या आदेशानुसार तसेच शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद ,जिल्हाप्रमुख  भगवानशेठ पोखरकर व भोसरी विधानसभा शहर प्रमुखnसंभाजीराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आजपिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.सदर तिरंगा यात्रेला मोठ्या उत्साहामध्ये शिवसैनिकांनी,युवकांनी ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सहभाग घेत भारतीय सैन्याचा जय -जयकार केला .

यावेळी तिरंगा रॅलीमध्ये शिवसेना महिला उपनेत्या सौ. सुलभाताई उबाळे ,शिवसेना नेते  निलेश मुटके,शिवसेना खेड तालुकाप्रमुख निलेश पवार ,  दादासाहेब उर्फ संतोष उकिर्डे (स्वतंत्र पत्रकार संपादक संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष),युवा सेना जिल्हा उपप्रमुख  अरुण जोगदंड , विभागप्रमुख श्रीकांत सुतार, सर्जेराव कचरे, संदीप जाधव, शिवसेना पदाधिकारी ,विभाग प्रमुख व शाखाप्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!