spot_img
spot_img
spot_img

स्व. दत्ता काका साने यांच्या स्मृती जपण्यासाठी कृष्णानगरमध्ये स्मृती प्रवेशद्वार उभारण्याची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिखली परिसराच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिलेले आणि नागरिकांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहिलेले स्व. दत्ता काका साने यांच्या कार्याचा आणि स्मृतींचा सन्मान व्हावा, यासाठी आकुर्डी–चिखली रस्त्यावरील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक (कृष्णानगर) येथे भव्य ‘स्मृती प्रवेशद्वार’ उभारण्यात यावे, अशी मागणी नगरसदस्या संगिता नानी ताम्हाणे यांनी केली आहे.

स्व. दत्ता काका साने यांनी चिखली परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या कार्यातून परिसराच्या विकासाची दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली निष्ठा दिसून येत होती.

त्यांच्या कार्याची आठवण पुढील पिढीलाही राहावी आणि त्यांच्या सामाजिक योगदानाला योग्य आदरांजली मिळावी, यासाठी कृष्णानगर येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात भव्य स्मृती प्रवेशद्वार उभारणे योग्य ठरेल, असे संगिता नानी ताम्हाणे यांनी सांगितले.

स्व. दत्ता काका साने यांच्या स्मृतींचे हे प्रवेशद्वार चिखलीच्या विकासाच्या इतिहासाची आणि त्यांच्या सामाजिक कार्याची कायमस्वरूपी आठवण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!