शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासोबतच नागरिकांना आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्देशाने उन्नती सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने ‘तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२६’ चे आयोजन करण्यात आले. शेकडो नागरिक आणि सायकलप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही रॅली देशभक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली.
उन्नती सोशल फाऊंडेशन, गोविंद ग्रुप, इंडो ॲथलेटिक सोसायटी आणि चॅलेंजर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी तिरंगा हातात घेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
यावेळी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका मा. सौ. अनिताताई संदीप काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. संजय भिसे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्तीची भावना, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धन या चारही बाबींचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
तिरंगा हातात घेत सायकलस्वारांचा उत्साहपूर्ण सहभाग
सकाळच्या प्रसन्न वातावरणात तिरंगा हातात घेऊन शेकडो सायकलस्वार रॅलीत सहभागी झाले. सायकलच्या प्रत्येक पेडलसोबत देशभक्तीची भावना व्यक्त करत सहभागी नागरिकांनी परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
लहान मुलांचा उत्साह, तरुणांचा जोश आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे रॅलीला विशेष रंगत आली. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत नागरिकांनी देशप्रेमाचा संदेश देत आरोग्य आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे महत्त्वही अधोरेखित केले.
यावेळी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून तिरंग्याच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेली सायकल रॅली हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. विशेष म्हणजे, या रॅलीत राष्ट्रप्रेमासोबत आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी या उपक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी तिरंगा हातात घेऊन सहभागी होणे ही आपल्या समाजातील राष्ट्रप्रेमाची जिवंत भावना दर्शवते.
आजच्या काळात सायकलिंगसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता निर्माण होते आणि त्याचबरोबर पुढील पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होते. उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. संजय भिसे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या उपक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले असून, भविष्यातही अशा विधायक सामाजिक उपक्रमांना निश्चितच प्रोत्साहन मिळाले पाहिजे.”
नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या,
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिरंगा हातात घेऊन सायकल चालवताना प्रत्येक सहभागीच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि देशप्रेमाची भावना अत्यंत आनंददायी होती. राष्ट्रध्वज हा आपल्या स्वाभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे ही अभिमानाची बाब आहे. या रॅलीची आणखी एक विशेष बाब म्हणजे राष्ट्रप्रेमासोबत आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. सायकलिंग ही केवळ व्यायामाची साधना नसून पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे अशा उपक्रमातून नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची आणि पर्यावरण जपण्याची प्रेरणा मिळते. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच सामाजिक बांधिलकीतून या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हीच या आयोजनाची खरी ताकद आहे. भविष्यातही नागरिकांच्या सहभागातून अशाच सकारात्मक आणि समाजोपयोगी उपक्रमांना पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
सहभागींसाठी विशेष सुविधा
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंसाठी आयोजकांच्या वतीने टी-शर्ट, BIB, मेडल आणि नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःची सायकल नसलेल्या नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होता यावे, यासाठी e-z pedal यांच्या सहकार्याने इलेक्ट्रिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे सायकलिंगचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या अनेक नागरिकांना या राष्ट्रभक्तीपर उपक्रमाचा भाग होता आले.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांची परंपरा
उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. समाजातील विविध घटकांना एका सकारात्मक व्यासपीठावर आणून सामाजिक जाणीव निर्माण करणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि समाजहिताच्या उपक्रमांना चालना देणे, या उद्देशाने फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
‘तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२६’ हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग ठरला. राष्ट्रप्रेमाला आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सहभागाची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला एक विधायक आणि प्रेरणादायी स्वरूप दिले.
नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने रॅलीला यश
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी नागरिक, सायकलस्वार, स्वयंसेवक, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सर्व आयोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तिरंगा हातात घेऊन सायकलच्या प्रत्येक पेडलसोबत राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या सहभागामुळे पिंपळे सौदागरमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.





Total Users : 213867