spot_img
spot_img
spot_img

प्रा. डॉ. विरेंद्र शेटे यांची आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिलवर निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विरेंद्र शेटे यांची इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (आईटीई), नवी दिल्लीच्या २०२६–२०२९ या कार्यकाळासाठी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून या सर्वोच्च राष्ट्रीय संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलवर निवड झालेले ते केवळ दोन प्रतिनिधींपैकी एक आहेत.

शिक्षण, संशोधन, प्रशासकीय नेतृत्व आणि संस्थात्मक विकास क्षेत्रातील ३२ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या प्रा. डॉ. शेटे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी १५० हून अधिक संशोधन निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके व परिषदांमध्ये प्रकाशित केले असून, त्यांच्या नावावर तीन पेटंट्स, पाच कॉपीराइट्स आणि तीन पुस्तके आहेत.

यापूर्वी त्यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य, शैक्षणिक परिषद सदस्य, परीक्षा मंडळ सदस्य, प्राचार्य/संचालक, उपप्राचार्य तसेच विभागप्रमुख अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. अध्यापन व विद्यार्थी विकासातील योगदानाबद्दल त्यांना ‘बेस्ट टीचर’ पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे.

आयईटीईमध्येही प्रा. डॉ. शेटे यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे. त्यांनी २०२२ ते २०२४ या कालावधीत आयईटीई पुणे केंद्राचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना ऑल इंडिया कॉन्फरन्स, झोनल सेमिनार, राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा, महिला सक्षमीकरण उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर इमिजिएट पास्ट चेअरमन म्हणून कार्यरत असताना आयईटीई पुणे केंद्राला २०२६ मध्ये ‘बेस्ट सेंटर अवॉर्ड’ मिळाला आहे.

त्यांची गव्हर्निंग कौन्सिलवर झालेली निवड ही त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक कार्याची, संशोधनातील योगदानाची आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जात आहे. या माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन आणि तांत्रिक नवोन्मेष क्षेत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल एमआयटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालिका डॉ. सुनीता कराड आणि कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी प्रा. डॉ. शेटे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय स्तरावर एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा शैक्षणिक आणि तांत्रिक ठसा अधिक भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!