spot_img
spot_img
spot_img

प्रगतीपथ यात्रेनिमित्त आमदार शंकर जगताप यांची केशवनगर शाळेच्या नूतनीकरण कामाची पाहणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘प्रगतीपथ यात्रा’ अभियानांतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केशवनगर येथील माध्यमिक शाळेच्या नूतनीकरण कामाची पाहणी केली.

या भेटीदरम्यान आमदार जगताप यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत कामाच्या दर्जाबाबत व प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शाळेचे नूतनीकरण दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी चिंचवड-काळेवाडी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षद नढे, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, मनीषाताई योगेश चिंचवडे, अपर्णाताई डोके, कोमल काळे, विनोद नढे, भाजप सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजप उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, काळूराम बारणे, संतोष कलाटे, सोनाताई गडदे आणि दिपाली कलापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सदर प्रकल्पाची सविस्तर माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता अंदुरे आणि कनिष्ठ अभियंता देवकर यांनी उपस्थितांना दिली. शाळेच्या नूतनीकरणामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!