शबनम न्यूज | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व आवश्यक सुविधा नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा तसेच वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. पालखी मार्गावर येणाऱ्या वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
आषाढी वारी पालखी सोहळा हा राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. त्यामुळे पालखी मार्गावरील सर्व यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
यावेळी पालखी मार्गावरील वाहतूक नियोजन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्य सेवांची उपलब्धता तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य बापू घोलप, उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता अनिल भालसाखळे, महेश कावळे, उप आयुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, अतुल पाटील, व्यंकटेश दुर्वास, ममता शिंदे, राजेश आगळे, चेतना केरूरे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे, अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे, अश्विनी गायकवाड, सहाय्यक आयुक्त उमा दर्वेश, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे,पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख, धिरज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश नांदुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, महेश बनसोडे, विनोद पाटील, वर्षाराणी पाटील, गोरख कुंभार, प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ महानवर, ज्ञानेश्वर धनगर, मोटार वाहन निरीक्षक विजय चौधरी, महामेट्रोचे चीफ डेव्हलपटमेंट मॅनेजर संदीप दुबे, चीफ रेसिडेंट इंजिनीअर यतेंद्र कुलकर्णी, देहू संस्थान विश्वस्त ह. भ. प. उमेश मोरे, आळंदी संस्थान विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, चैतन्य कबीर महाराज, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ऍड. राजेंद्र उमाप यांच्यासह महावितरण तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


