spot_img
spot_img
spot_img

काँग्रेस कार्यकारणी आठवड्याभरात जाहीर करू – नरेंद्र बनसोडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अंतर्गत पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांची बैठक काल संभाजीनगर चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे होते.

बैठकीची सुरुवात वंदे मातरम सामूहिक गायनाने करण्यात आली. नितीन सोनवणे, रितिका शर्मा आणि विल्यम साळवी या तीन सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश या बैठकी अंतर्गत करण्यात आला.

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्याचे कौतुक केंद्रीय नेतृत्वाकडून करत त्यांना पाठबळ दिल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला
राज्यसभेच्या जागांवर निवडून आलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मन्सूर अली खान, नीरज डांगी, प्रवीण चक्रवर्ती, प्रणव झा, यांच्याही अभिनंदनचा ठराव संमत करण्यात आला.

बैठकीमध्ये मतदार यादी विशेष सखोल पुनर्परीक्षण मोहिमेमध्ये असणाऱ्या जबाबदाऱ्या व दक्षता याबाबत माहिती देत बूथ कमिट्यांची स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली, संघटनात्मक आढावा घेण्यात आला, राजकीय परिस्थितीचा आढावा राज्य शासनाच्या धोरणावर चर्चा व स्थानिक प्रश्न नागरिकांच्या समस्या याबाबत चर्चा करण्यात आली.

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त करत पक्षकार्यासाठी सूचना दिल्या.

या दरम्यान बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, येणारा काळ हा अतिशय दक्षतेने राहण्याचा आहे मतदार यादी पुन परीक्षण मोहिमेअंतर्गत निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष हा भाजप विरोधी मतांना मुख्यत्वे अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय समाजाला तसेच काँग्रेसच्या बाजूने असणाऱ्या सर्व सामान्य लोकांना मतदार यादीतून वगळण्याचे शरयंत्र करू शकतो याला आपण दक्षपणे सामोरे गेले पाहिजे, कार्यकर्त्यांना अधिकाधिक प्रमाणामध्ये बूथ यंत्रणांच्या माध्यमातून बीएलओ सोबत काम करण्यासाठी सक्रिय झाले पाहिजे. येणाऱ्या काळात पक्षाकडून अतिशय नाविन्यपूर्ण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर न्याय मिळवणार आहोत पण सध्या ऑक्टोबर पर्यंत फक्त मतदार यादी सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रमांमध्ये आपल्या नागरिकांची नावे सुरक्षित ठेवण्याचे काम आपण सर्वांनी करूया असे आवाहन करत, लवकरच आठवड्याभरात नवीन काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल” असे बनसोडे यांनी सांगितले.

एन एस यु आय च्या शहराध्यक्षपदी निवड झालेल्या सौरभ शिंदे यांचा सत्कार प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोकराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी काँग्रेस नेते अभिमन्यु दहितुले, गौतम आरकडे, समिता गोरे, स्वप्नील बनसोडे, बी बी शिंदे, शहाबुद्दीन शेख, विल्यम साळवी, नितीन सोनवणे यांनी मनोगते व्यक्त केली.

युवराज पवार, बी.आर. माडगूळकर, शिल्पा गायकवाड, सुधाकर कुंभार, शाम भोसले, प्रवीण कांबळे यांनी पक्ष वाटचाली साठी उपयोगी सूचना दिल्या.

याप्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, क्रीडा सेलच्या प्रदेशाध्यक्ष समिती गोरे, गौतम अरकडे, अशोक मंगल, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, एन एस यु आय चे अध्यक्ष सौरभ शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस स्वप्निल बनसोडे, उमेश खंदारे, सेवादलाचे कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, जेष्ठ नेते बी.बी. शिंदे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस संदीप शिंदे, हिराचंद जाधव, हरीश डोळस, जितेंद्र छाबडा, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, गांधी विचार प्रसारक बी आर माडगूळकर, इस्माईल संगम, कुणाल भोसले, पठाण चाचा, सुरज कुलकर्णी सर, युवराज पवार, मनीषा पवार, शिल्पा गायकवाड, प्रफुल्ला मोतलिंग, अनिता राठोड, विलास सकट, सुरज गायकवाड, अमरजीत सिंग पोथीवाल, फिरोज तांबोळी, नासिर चौधरी, रिजवान शेख, संदेश जगताप, डेनिस पॉल, राजन नायर, वामन अहिरे, भास्कर नारखेडे, महादेव वाळुंजकर, रोहित शेळके, विशाल कांबळे आधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र छाबडा तर आभार प्रदर्शन विजय ओव्हाळ यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!