spot_img
spot_img
spot_img

कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्या; विशाल काळभोर यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा वेचक गाड्यांवर निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुमारे २५० कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खाजगी सचिवांसह महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून कामगारांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेल्या अनेक कामगारांनी काळभोर यांच्या कार्यालयात भेट देऊन आपल्या अडचणी मांडल्या. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने मुलांच्या शाळेच्या प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शुल्क तसेच दैनंदिन कौटुंबिक खर्च भागवताना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर विशाल काळभोर यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांचे थकीत वेतन वितरित करावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाकडून माहिती घेऊन कामगारांचे वेतन लवकरच वितरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे काळभोर यांनी सांगितले.

कामगारांच्या कुटुंबांवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!