spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत दुचाकीवरून अवैध मद्य वाहतूक; १०० दारूच्या बाटल्या जप्त

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी परिसरात दुचाकीवरून अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत १०० दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील इराणी कॅफेसमोर पोलिसांनी तपासणीदरम्यान एका दुचाकीस्वारास ताब्यात घेतले. तपासात त्याच्या ताब्यात देशी पॉवर लाईम पंच कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या १०० बाटल्या आढळून आल्या.

जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची किंमत सुमारे ४ हजार रुपये असून आरोपीकडे मद्य वाहतूक अथवा विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी राजू नसिंह राम (वय ३४, व्यवसाय मजुरी) याच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एमएच ४२ बीआर ९३७२ क्रमांकाच्या होंडा दुचाकीवरून मद्याची वाहतूक करत होता.

पोलीस शिपाई नंदलाल शिवाजी राऊत यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपीस बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५(ई) व ८३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!