शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गा देवी टेकडी निगडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख चेतन अण्णा पवार तसेच अशोकराव वायकर गोविंदराव शिंदे जाधव सर ऋषिकेश घोरपडे कृष्णा माने अमीर मुजावर आदित्य पाटील जगदीश माळी हे सर्व जण उपस्थित होते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन युवासेना पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी केले होते.
यावेळी चेतन पवार यांनी पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन नागरिकांना केले.





Total Users : 213915