spot_img
spot_img
spot_img

हजरत शमशुद्दीनशाह बाबा रहे दर्ग्याचे उर्स धार्मिक कार्यक्रमाने संपन्न

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

कॅम्प पुणे बॉम्बे गॅरेज जवळील हजरत शमशुद्दीनशाह बाबा रहे या दर्ग्याचे उर्स शरीफ विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाले. या दर्ग्याच्या उत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे नागरिक या मध्ये सहभागी झाले होते. ऊस कमिटीचे अध्यक्ष दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 22 वर्षापासून हा उत्सव साजरा होत आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांसाठी लंगराची व्यवस्था केली होती. यावेळी दर्ग्याभोवती विद्युत रोषणाई व फुलांनी सजवण्यात आली होती. यावेळी उर्स कमिटीचे उपाध्यक्ष दिनेश अर्दाळकर, विजय सोनवणे, अल्फात सय्यद, महेश गुंडाली, उमेश परदेशी, दीपक म्हस्के, रोहन गवांडे, रीना अडागळे, समीर सय्यद, आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!