spot_img
spot_img
spot_img

संत अँथनी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॅम्प येथे रिपब्लिकन ख्रिश्चन सेलच्या वतीने 4000 नागरिकांना मिठाईवाटप व मिरवणूक

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

संत अँथनीचा (feast of St Anthony) हा कॅथॉलिक ख्रिश्चनांद्वारे दरवर्षी 13 जून रोजी पादुआच्या संत अँथनी यांच्या स्मरणार्थ सेंट अँथनी ऑफ पाडूआचा सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पुणे कॅम्प शिवाजी मार्केट समोरील सेंट अँथनी क्षाइन चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित 4000 ख्रिश्चन बांधवांना रिपब्लिकन ख्रिश्चन सेलच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले होते. यावेळी संत अँथनी यांची फुलांनी सजवलेल्या रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये पुणे शहरातून विविध ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, नगरसेविका हिमानी कांबळे, महिपाल वाघमारे, आकाश पवार, शैलेंद्र जगताप, मुकुंद भंडारी,अमित सोनवणे, जॉन सिंग, येशू दोरा स्वामी, कॉलिन वॉल्श, राजन राजमनी, विनेश पिल्ले, रॉकी अँथोनी, स्टॅन्लींन नाथन, फ्रान्सिस सांतामात्यि, रॉबर्ट दास, जॅकी रॉड्रिक्स, अरुण पवार, ग्रॅण्डली नोराणा, आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!