spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिका-यांची नियोजन बैठक संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणेच यावराषीही ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्य कुशाग्र कदम, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पिंपरी चिंचवड कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील,कृष्णा पाटील उपस्थित होते.

बैठकीदरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विचार प्रबोधन पर्वा’च्या कार्यक्रमाचे नियोजन, रूपरेषा, नागरिकांचा सहभाग तसेच जनजागृतीच्या माध्यमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून ऑनलाईन सूचना घेण्यात येणार यावेळी नागरिक, सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांनी ‘विचार प्रबोधन पर्वासंदर्भातील सूचना, उपक्रमांच्या कल्पना आणि कार्यक्रमांसाठीचे प्रस्ताव माहिती व जनसंपर्क विभागाच्या [email protected] या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!