spot_img
spot_img
spot_img

मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संजय मराठे यांची नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार संजय मराठे यांची मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे आयोजित मराठी पत्रकार संघाच्या महाअधिवेशन २०२६ दरम्यान संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

मंगळवार (दि. ९) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई येथे अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता क्षेत्रातील योगदान, सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग याची दखल घेत संजय मराठे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियुक्तीनंतर त्यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्क आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार संजय मराठे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


संजय मराठे यांच्या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघाचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.

कार्यक्रम प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले. तर उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या पत्रकार सदस्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावेळी मांडल्या. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील आदी पत्रकार बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!