शबनम न्यूज | प्रतिनिधी
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट Aamir Khan पुन्हा एकदा आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. आता स्वतः आमिर खानने एका मुलाखतीत या चर्चांना दुजोरा देत ५ जुलै रोजी तो गर्लफ्रेंड Gauri Spratt हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे.
आमिर खानचे हे तिसरे लग्न असणार आहे. यापूर्वी त्याने १९८६ मध्ये Reena Dutta यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला दोन मुले असून २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती Kiran Rao यांच्यासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा असून २०२१ मध्ये दोघे विभक्त झाले.
दरम्यान, गेल्या वर्षी आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आमिर खानने गौरी स्प्रॅटची सर्वांसमोर ओळख करून दिली होती. गौरी मूळची बेंगळुरूची असून दोघेही त्याआधी सुमारे दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
आता ५ जुलै रोजी होणाऱ्या या विवाहसोहळ्याकडे बॉलीवूडसह चाहत्यांचेही लक्ष लागले आहे. आमिर खानच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीबाबत सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


