spot_img
spot_img
spot_img

“सलग दुसऱ्यांदा केसदान; निशा अनिकेत प्रभु यांचा कॅन्सरग्रस्तांसाठी प्रेरणादायी उपक्रम”

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी दुसऱ्यांदा केसदान; सौ. निशा अनिकेत प्रभु यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत सौ. निशा अनिकेत प्रभु यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सलग दुसऱ्यांदा केसदान करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. कॅन्सरवरील उपचारांमुळे केस गमावलेल्या रुग्णांना आत्मविश्वास मिळावा आणि त्यांच्यासाठी विग तयार करता यावेत या उद्देशाने त्यांनी आपले केस दान केले.
यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्येही त्यांनी ‘मदत ट्रस्ट, मुंबई’ या संस्थेमार्फत केसदान केले होते. त्या वेळी त्यांच्या या उपक्रमाची विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. समाजात केसदानाबाबत जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,या हेतूने त्यांनी पुन्हा एकदा केसदान करण्याचा निर्णय घेतला.
दीर्घकाळ केस वाढवून त्यांची योग्य निगा राखल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा केसदान केले. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी विग तयार करण्यासाठी या केसांचा उपयोग होणार आहे,उपचारांच्या काळात अनेक रुग्णांचा आत्मविश्वास कमी होतो,अशा वेळी केसदानासारखे योगदान त्यांच्या मानसिक बळासाठी महत्त्वाचे ठरते.

सौ. निशा प्रभु या सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असून विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. “रक्तदान, अवयवदान याप्रमाणेच केसदान देखील समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे.आपल्या छोट्याशा योगदानातून एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास परत येऊ शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!