spot_img
spot_img
spot_img

पर्यावरण दिनानिमित्त फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे वृक्षारोपण संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारची झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपणाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून “माझी एमआयडीसी – हरित एमआयडीसी, स्वच्छ एमआयडीसी” हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून त्याला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तसेच एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांनी आपल्या आस्थापनाबाहेरील जागेत वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील काळात संपूर्ण एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार असून अनेक कंपन्या या पर्यावरणपूरक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे श्री अभय भोर यांनी सांगितले.
या उपक्रमात दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष कु. दुर्गा भोर, उपाध्यक्ष वैभव जगताप, उद्योजक जसबिंदर सिंग, हेमंत दास, सुरेश वाणी, अमोल चव्हाण, निरंजन मनवर, डॉ. निवेदिता सावंत, अवंतिका भोर, स्वाती दुबळे, माही शेख तसेच अन्य पदाधिकारी, उद्योजक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कु. दुर्गा भोर यांनी सांगितले की, आगामी पावसाळ्यात विशेष पर्यावरण जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. केवळ झाडे लावणे नव्हे, तर “झाडे लावा आणि झाडे जगवा” या संकल्पनेनुसार लावलेल्या झाडांचे संगोपन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार केला.
झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण वाचवा हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!