spot_img
spot_img
spot_img

पर्यावरण दिनानिमित्त हरित भविष्यासाठी सामूहिक संकल्प!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आकुर्डी गाव-शाहूनगर मंडळाच्या वतीने मोहन्नगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य वृक्षारोपण अभियानात सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शंकर उद्यान, ईएसआय हॉस्पिटल परिसर, मोहन्नगर पोलीस चौकी आणि बालाजी मंदिर परिसरात वृक्षारोपण करून हरित आणि स्वच्छ परिसर घडविण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आज लावलेले प्रत्येक रोपटे उद्याच्या पिढीसाठी शुद्ध हवा, निरोगी जीवन आणि सुरक्षित पर्यावरणाची हमी ठरणार आहे.

या प्रसंगी स्थानिक नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी  राजू दुर्गे, श्रीमती ऐश्वर्या अमित बाबर, मयूर काळभोर, प्रसाद शेट्टी, अजिंक्य गोळे, मंडलाध्यक्ष  धरम वाघमारे, तसेच इतर पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी तथा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!