spot_img
spot_img
spot_img

जुनी सांगवी प्रभाग क्र. ३२ मध्ये अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जुनी सांगवी प्रभाग क्र. ३२ मध्ये मंगळवार, ३ मे २०२६ रोजी अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासन कारवाई करण्यात आली. या सदर कारवाईमध्ये मधुबन नगर व ममता नगर परिसरातील अंदाजे ४८० चौरस मीटर क्षेत्रफळाचे २ आर.सी.सी. अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली ही मोहीम राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान उप अभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे तसेच महानगरपालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक शाबोद्दिन बागवान, प्रफुल्ल भोकरे व सुरज माने यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या मोहिमेस महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १८ जवान, ६ मजूर तसेच १ जेसीबी (नीडल), २ ट्रॅक्टर ब्रेकर व १ गॅस कटर यांच्या सहाय्याने आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.

शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची प्रक्रिया पुढील काळातही नियमितपणे सुरू राहील. नियोजित विकास व सार्वजनिक सुरक्षिततेच्या हितार्थ नियमबाह्य बांधकामांवर आवश्यक ती कार्यवाही कायम ठेवण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!