spot_img
spot_img
spot_img

फुगेवाडी विषारी दारू दुर्घटना: पीडितांना ५ लाखांची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आ. अमित गोरखे यांचा पाठपुरावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 फुगेवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी विषारी दारू दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे जाहीर केलेली ५ लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महत्त्वपूर्ण
पाठपुरावा केला. यावेळी आमदार गोरखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन प्रशासकीय कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

मंत्री महोदयांचे आश्वासन
फुगेवाडी येथे घडलेल्या या धक्कादायक विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री श्री. गिरीशजी महाजन यांनी पीडित कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने या घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

मदतीची तातडीने आवश्यकता
या दुःखद घटनेला आता काही काळ उलटून गेला असून, बाधित कुटुंबे अजूनही या आर्थिक मदतीची प्रतीक्षा करत आहेत. घरातील प्रमुख कमावती व्यक्ती गमावल्यामुळे या सर्व कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यांना तातडीने आधाराची आणि मदतीची गरज असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात यावी
मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार, मृत व्यक्तींच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यात यावी. मदतीची रक्कम लवकरात लवकर पीडितांच्या बँक खात्यावर थेट जमा व्हावी, अशी मागणी यावेळी आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केली आहे.

आमदार अमित गोरखे यांनी घेतलेल्या या तत्पर पाठपुराव्यामुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या सकारात्मक चर्चेमुळे फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना लवकरच शासनाची मदत मिळून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!