शबनम न्यूज | पुणे प्रतिनिधी शंकर जोग
पुणे शहरातील शिवसेना भवन मध्ये सुरू होणार विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासवर्ग आणि अभ्यासिका दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ गोऱ्हे यांनी सांगितले, दहावी बारावीनंतर नेमकं काय करिअर निवडायचे असा प्रश्न अनेकांना पडतो आजकालच्या स्पर्धेच्या जगामध्ये सर्व पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी सेटल व्हावे असे वाटते म्हणून विद्यार्थ्यांनी कठोर परीक्षण करून आपल्या करिअरमध्ये नावलौकिक करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे प्रमुख अनिल गडकरी सर, निलेश जगताप, अश्विनी मटारे, यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षकतज्ञ व समुपदेशक अनिल गुंजाळ सर, विजय कचरे सर सहशिक्षक समुपदेशक यांची विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक व धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष राज्य प्रमुख वैभव वाघ, संदीप शिंदे, प्रकाश ढमढेरे, विश्वास दिघे सुधीर जोशी सुदर्शना त्रिगुणाताई आदी उपस्थित होते.


