spot_img
spot_img
spot_img

दहावीच्या निकालात पीएम श्री विद्यालय थेरगावची चमक; २५ विद्यार्थी बक्षीसासाठी पात्र

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी दहावी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक बक्षीस देण्यात येते. यंदाही पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी महानगरपालिकेच्या बक्षीस योजनेस पात्र ठरले आहेत.

यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. श्वेता अचमलवाड हिने ९३.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आविष्कार घोगरे याने ९२.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला असून आरती गंधले हिने ९१.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

तसेच ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे ९ विद्यार्थी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या बक्षिसासाठी पात्र ठरले आहेत. तर ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच उर्दू माध्यमातील आयेशा नदाफ हिने 85.40% गुण मिळवत 50 हजार रुपये बक्षीस साठी पात्र ठरली आहे. तिचे देखील मुख्याध्यापक व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पर्यवेक्षक मंजुषा टिळेकर आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे घवघवीत यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!