शबनम न्यूज | वृत्तसंस्था
तामिळनाडू : थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक ११८ आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता शनिवार, ०९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजया टीव्हीके प्रमुख विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय याला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्याची माहिती मिळाली आहे.
शनिवारचा दिवस तामिळनाडूसाठी ऐतिहासिक दिवस असेल. शुक्रवारी रात्री राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. लोकभवनात झालेल्या बैठकीनंतर शपथविधी सोहळ्याच्या घडामोडींना वेग आला आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
निवडणूक निकालानंतर बहुमतासाठी लागणारा आकडा गाठताना ओढाताण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके या प्रमुख पक्षांनी जनमताचा आदर करत विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. टीव्हीकेचे नेते कामराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असून मित्रपक्षांच्या साथीने एक स्थिर सरकार तामिळनाडूमध्ये स्थापन होईल. टीव्हीके आणि काँग्रेसचे मिळून 113 आमदार होते. त्यात आता डाव्या पक्षाचे 4 आणि व्हीसीके पक्षाचे 2 आमदारांनी पाठिंबा देवू केला आहे. त्यामुले हा आकडा आता 119 झाला आहे. जो की बहुमता पेक्षा एकने जास्त आहे.



