प्रशासकीय कारणास्तव निर्णय; सोमवारपासून नव्या वेळेनुसार उपक्रम राबविणार
प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “पोलीस आयुक्तांची भेट” या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या वेळेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी, समस्या व सूचना थेट ऐकून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दर सोमवारी राबविण्यात येत असून, यापूर्वी तो दुपारी ४.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आयोजित केला जात होता. मात्र, आता या वेळेत अंशतः बदल करण्यात आला असून, उद्या सोमवार (दि. ४ मे २०२६) पासून पुढे हा उपक्रम दर सोमवारी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत घेण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे नागरिकांना पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असून, विविध तक्रारी, समस्या तसेच सूचना मांडता येतात. बदललेल्या वेळेबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे नागरिक व पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होत असून, लोकसहभागातून समस्या निराकरणाचा प्रयत्न केला जात आहे.




Total Users : 224196