शबनम न्यूज | प्रतिनिधी
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात महागाईचा भडका उडताना दिसत आहे. याच दरम्यान तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.
मुंबईत १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २१८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपये, तर मुंबईत २,०३१ रुपयांवर पोहोचली आहे.
या वाढीचा थेट परिणाम छोट्या व्यावसायिकांवर, हॉटेल व्यवसाय, तसेच विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कमर्शियल दरवाढीमुळे बाजारातील इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



