spot_img
spot_img
spot_img

आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार

शबनम न्यूज : प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरातून जाहीर सत्कार होत आहेत याच निमित्ताने पिंपरीमध्ये, संविधान हाउसिंग सोसायटी व गणेश मित्र मंडळ यांच्यावतीने तसेच सुरेश लोंढे यांच्या पुढाकाराने आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेविका निकिता कदम, स्मिता सुरेश लोंढे, एडवोकेट गोरक्ष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

तसेच या कार्यक्रमात गणेश मित्र मंडळ, महिला मंडळ संविधान हाउसिंग सोसायटी चे सर्व पदाधिकारी रहिवासी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!