spot_img
spot_img
spot_img
spot_img

पाच वर्षांत एक लाख उद्योजक घडविण्याचा संकल्प

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठा समाजातील युवक, शेतकरी, महिला आणि नवउद्योजकांनी उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उतरण्यासाठी मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यात ‘बिझनेस ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी कॉन्क्लेव्ह २०२६’चे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात पुढील पाच वर्षांत एक लाख उद्योजक घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला पुरुषोत्तम खेडेकर, संजय वायाळ, राजेंद्र पाटील, अर्जुन खामकर, रामदास काकडे, शरद काळे, अविनाश जोगदंड, विजय सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते.

यावेळी उद्योजकांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्य, नेटवर्किंग, डिजिटल विपणन तसेच निर्यातीच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मोशी येथे ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनात महिला उद्योजकांसाठी सुमारे २५० स्टॉल्स, स्टार्टअप्स, रोजगार, कौशल्य आणि मनुष्यबळासाठी स्वतंत्र संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जागतिक स्तरावर मराठा उद्योजकांचे नेटवर्क निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!