spot_img
spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर विद्यार्थी आघाडी पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी अजय पवार यांची नियुक्ती

शबनम न्यूज | पुणे प्रतिनिधी शंकर जोग

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार व खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेत अजय विजय पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर विद्यार्थी आघाडी पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप व पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शहरातील युवा संघटन अधिक मजबूत करणे तसेच
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे शिष्यवृत्तीचे प्रश्न. वस्तीगृहाचे प्रश्न. आणि प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडी सदैव अग्रेसर राहील असा विश्वास अजय पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी योगेश वराडे, पंकज साठे, शुभम माताळे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!