पिंपरी : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सुंदर कांबळे युवा मंचाच्या वतीने मंगळवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी पिंपरी परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून तब्बल ५०० पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात सुंदर कांबळे युवा मंचाचे अध्यक्ष आयु. सुंदर कांबळे तसेच समन्वयक श्री. दिनेश रोकडे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.

यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे पुणे जिल्हा प्रभारी आयु. प्रसाद शेलार, हरिभाऊ वाडमारे, प्रकाशनामा वृत्तपत्राचे संपादक आयु. सचिन अहीरे, राजे ग्रुपचे अध्यक्ष रामदासभाई, अमितभाई, आर्या संविधान महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अनिताताई कांबळे, वृषालीताई कदम, मंगलताई साळवे, कौशलताई सोनावणे, संतोष कुचेकर तसेच आकाश मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीपभाऊ कांबळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाला.



