spot_img
spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली पिंपरी-चिंचवड जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने दि. २४ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ४२५ हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा मानाचा किताब पिंपरी-चिंचवड शहराने पटकावला. सांघिक गटात मुंबईने प्रथम, सातारा जिल्ह्याने द्वितीय, तर सांगली जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. गोंदिया जिल्ह्याला ‘शिस्तबद्ध संघ’ म्हणून गौरविण्यात आले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी व पदके प्रदान करण्यात आली.

स्पर्धेस राष्ट्रीय थाई बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. पी. वाय. आत्तार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव श्री. अजय खेडगरकर, कार्याध्यक्ष श्री. विशाल माळी, टेक्निकल डायरेक्टर श्री. वजीर शेख, पुणे विभागप्रमुख श्री. अमोल माने, मुंबई विभागप्रमुख श्री. हरिओम चव्हाण, नागपूर विभागप्रमुख श्री. सलीम शेख, नाशिक विभागप्रमुख श्री. राज कांबळे, कोल्हापूर विभागप्रमुख श्री. रविराज गाढवे, तसेच राष्ट्रीय महिला प्रशिक्षक कु. प्रियंका अचमट्टी व कु. शुभांगी सहारे यांची उपस्थिती लाभली.

स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट पंच म्हणून निशान चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्री. नाजिम शेख, श्री. गणेश मांढरे आणि श्री. अभिषेक शिंदे यांनी उत्कृष्टरीत्या केले. स्पर्धेचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. रविराज गाढवे यांनी केले. संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दि. ६, ७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजी छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातील खालील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले सुवर्णपदक विजेते खेळाडू

  • ०९ वर्षांखालील गट: अद्वैत गायकवाड, अनय पालवे
  • १२ वर्षांखालील गट: पियुष गुप्ता, शौर्यसिंग इंगळे, जीवन चव्हाण, रेयांश नारायण, अपूर्वा टेकाळे
  • १७ वर्षांखालील गट: इसक्की तेवर
  • १९ वर्षांवरील गट: कृष्णा दिवेकर, सुरज भोंडे, अमीन आत्तार, अजित जैस्वाल
  • युथ/ज्युनिअर गट (मुली): जान्हवी साबळे, आर्या बोऱ्हाडे, निधी भोसले
  • युथ/ज्युनिअर गट (मुले): आर्यन शेंडगे, गौरव शेलार, हरिस सेंथिल कुमार

वरील सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या या सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही हे खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!