spot_img
spot_img
spot_img

निगडीत महिलेला शिवाजीनगरला येण्यास नकार; संतापलेल्या परिचिताची मारहाण, अटक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

निगडीतील संग्रामनगर झोपडपट्टी परिसरात परिचित असलेल्या व्यक्तीसोबत शिवाजीनगर येथे राहण्यास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेसह तिच्या बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू बापू शेलार (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शनिवारी (२५ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संग्रामनगर झोपडपट्टीतील त्यांच्या बहिणीच्या घरी ही घटना घडली.

आरोपी पांडुरंग चंद्रकांत जाधव (वय २८, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) हा फिर्यादीच्या घरी येऊन तिच्यासोबत शिवाजीनगरला राहण्यासाठी येण्याचा आग्रह करू लागला. फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने संतापून फिर्यादी व तिची बहीण आयशा शेख यांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच नखाने ओरबाडणे, केस ओढून डोके जमिनीवर आपटणे, लाकडी दांडक्याने मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!