spot_img
spot_img
spot_img

अजितदादा सेवा सप्ताहानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअर मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अजितदादा सेवा सप्ताह’ अंतर्गत शेखर चिंचवड युथ फाऊंडेशनच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्याशी हितगुज साधले आणि शिक्षण, परिश्रम व समाजाप्रती जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधी, उच्च शिक्षणाचे पर्याय आणि स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी मोठा लाभ घेतला.

यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाभिमुख उपक्रम राबविल्याबद्दल शेखर चिंचवड युथ फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम अधिकाधिक राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास नगरसेवक शेखरअण्णा चिंचवडे, राजाभाऊ चिंचवडे, खंडू तात्या चिंचवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!