पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पुनावळे गावठाण परिसरात सुरू असलेल्या फ्लॅश जुगारावर रावेत पोलिसांनी छापा टाकून चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी दुपारी बोरगेवाडा येथील जुन्या पडक्या वाड्याच्या मोकळ्या जागेत सिद्धराम निरगुडे, सुबोध ढोले, पांडुरंग भुजबळ आणि किरण रोकडे हे चौघे आर्थिक फायद्यासाठी पैशांची बाजी लावून फ्लॅश हा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 52 पत्ते, रोख रक्कम व इतर जुगार साहित्य असा एकूण ₹980 चा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



