spot_img
spot_img
spot_img
spot_img

चिखलीत घरासमोरून रॉयल एनफिल्ड बुलेटची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

चिखली परिसरातून घरासमोर उभी केलेली रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रात्री 10 ते 24 जुलै पहाटे 5.25 वाजण्याच्या दरम्यान मोरेवस्ती, साने चौक येथील मोरया हाऊसिंग सोसायटी परिसरातून वेदांत राजेंद्र पाटील (वय 22) यांची एमएच-43 बीटी-0814 क्रमांकाची ग्रे रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट (किंमत ₹35 हजार) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

या प्रकरणी चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!