spot_img
spot_img
spot_img
spot_img

पुनवळेतील सर्व्हिस रोडचे काँक्रीटीकरण सुरू ; नवनाथ ढवळे यांची कामाची प्रत्यक्ष पाहणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात पुनवळे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर पुनवळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शंकर जगताप तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्याकडे तातडीने खड्डे दुरुस्त करून दोन्ही सर्व्हिस रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार शंकरभाऊ जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक सूचना दिल्यानंतर सर्व्हिस रोडच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष पाहणी नवनाथ मारुती ढवळे, सचिव, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांनी केली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रारंभाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार शंकरभाऊ जगताप तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मनःपूर्वक आभार मानले.

तसेच हे काम उच्च दर्जाचे व निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!