spot_img
spot_img
spot_img

कच्चा माल स्वस्तात देण्याचे आमिष; व्यावसायिकाची साडेतीन लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

कच्चा माल घाऊक दरात पुरवण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ३ लाख ४७ हजार ८८३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मगरध्वज संभाजी बिरादार (वय ६४, रा. भोसरी) हे चरोली बायपास रोडवरील सुभद्रा पॅकेजिंग शॉपमध्ये असताना आरोपी नीरज अग्रवाल याने स्वतःची “ब्रँडेड पॉलिवे मॅन्युफॅक्चरिंग अँड सप्लाय” नावाची कंपनी असल्याचे भासवले. पीपी ओव्हन बॅग उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल घाऊक दरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपीने मोबाईलवर कच्च्या मालाचे ३.४७ लाख रुपयांचे बिल पाठवून फोनपे स्कॅनर, बँक खाते आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. फिर्यादीने आयएमपीएस आणि आरटीजीएसद्वारे रक्कम पाठविल्यानंतर आरोपीने ना कच्चा माल पुरवला, ना पैसे परत केले.

फसवणुकीची खात्री झाल्यानंतर फिर्यादीने आळंदी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ऑनलाईन व्यवहार करताना कंपनीची पडताळणी न करता मोठ्या रकमेचे व्यवहार टाळावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!