spot_img
spot_img
spot_img

बँक खात्यातून परस्पर १०.७४ लाख रुपये लंपास; चाकणमधील तरुण सायबर फसवणुकीचा बळी

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

चाकण परिसरातील एका तरुणाच्या बँक खात्यातून त्याच्या संमतीशिवाय १० लाख ७४ हजार १२९ रुपये परस्पर काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकुमार पटलेस लोणी (वय ३२, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांचे अॅक्सिस बँकेच्या चाकण शाखेतील खात्यातून १६ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत त्यांच्या परवानगीशिवाय विविध व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांमधून एकूण १०.७४ लाख रुपयांची रक्कम वळती करण्यात आल्याचे समोर आले आहे.

खात्यातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर गुन्हेगारांनी नेमकी कोणती पद्धत वापरून खाते हॅक केले किंवा व्यवहार केले याचा तपास सुरू असून आर्थिक गुन्हे शाखेचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!