spot_img
spot_img
spot_img

जिल्हा परिषद येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

योग ही भारत देशाने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे; निरोगी व सशक्त समाज निर्मितीसाठी योगाचे महत्त्व समजून प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हा परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आला. यावेळी  उपायुक्त पशुसंवर्धन राजेश वासनिक, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) डॉ. शोएब इनामदार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित तसेच  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. हंकारे म्हणाले, शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य संवर्धनासाठी योगा करणे गरजेचे आहे. नियमित योगा केल्याने तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.तसेच आजारांपासून बचाव होण्यास मदत होते, असेही डॉ. हंकारे म्हणाले.

श्रीमती माधवी मागलेकर योग प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!