पुणे शहर प्रतिनिधी शंकर जोग
आरपीआयची ताकद ख्रिश्चन समाजालाही मिळावी यासाठीच ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उद्दिष्ट समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार आहे याच विचारातून ख्रिश्चन समाजालाही पक्षाच्या संघटनात्मक ताकदीशी आणि सामाजिक न्यायाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली. असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी व्यक्त केले.
यावेळी रिपब्लिकन ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ता ख्रिस्तोफर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका इमानी कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी रिपब्लिकन ख्रिश्चन आघाडी पुणे शहरामध्ये विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आले यामध्ये पुणे शहर महिला अध्यक्ष डार्थी रोड्रिक्स, पुणे शहर उपाध्यक्ष येशू दोरास्वामी, पुणे शहर सचिव कॉलिन वॉल्श,
पुणे कॅम्प विभाग अध्यक्ष विनोद चंडालिया, हडपसर विभाग अध्यक्ष फ्रान्सिस सांतामात्यि, सोलापूर बाजार प्रभाग शाखाध्यक्ष स्टेनली फ्रान्सिस नेथन, वानवडी शाखाध्यक्ष विनेश पिल्ले, घोरपडी मुंढवा प्रभाग अध्यक्ष रॉकी अँथोनी, कोंढवा शाखाध्यक्ष राजन राजमनी, वडगाव शेरी शाखाध्यक्ष रॉबर्ट दास, इत्यादींना नियुक्त करण्यात आली.


