spot_img
spot_img
spot_img

समजावणीस गेलेल्या तरुणावर फायटरने हल्ला; ‘आमच्या नादी लागशील तर मारून टाकू’ची धमकी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

निगडीतील यमुनानगर परिसरात मित्राला झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर फायटर आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोन जणांसह ८ ते १० अनोळखी इसमांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद गव्हाणे (वय २२) हे मित्र अमोल खुडे यांच्यासह त्यांचा मित्र सावन राठोड याला झालेल्या मारहाणीबाबत समजावणी करण्यासाठी चिकन चौक, यमुनानगर येथे गेले होते. त्यावेळी आरोपी अमर कसबे याने फिर्यादीला हाताने मारहाण करून हातातील फायटरने डाव्या कानामागे वार केला.

यानंतर आरोपी अमर उघडे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच “आमच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत, आमच्या नादी लागशील तर मारून टाकू,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी निगडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!