spot_img
spot_img
spot_img

कुदळवाडीतील गोदामाला भीषण आग ; नुरा मशिदीजवळील घटनेने खळबळ

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात नुरा मशिदीजवळ असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोळ पसरले असून दूरवरूनही धूर दिसत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

सुदैवाने संबंधित गोदामाच्या आजूबाजूचा परिसर तुलनेने मोकळा असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची तीन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटविण्यात आले असून पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!