spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील महिला पुरवठादार फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ मे २०२६ रोजी सकाळी १०.५८ वाजण्याच्या सुमारास पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील अशोकनगर येथील बिल्डिंग क्रमांक ४ शेजारी, म्हसोबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई संतोष बिभीषण सपकाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सापळा रचून अभिषेक उत्तम कांबळे (वय २५, रा. बौद्धनगर, पिंपरी) याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून ५७२ ग्रॅम गांजा, एक मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा सदर अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपीकडे गांजाबाबत चौकशी केली असता, त्याने हा गांजा गीता मलकेकर (रा. भाटनगर, पिंपरी) हिच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानुसार संबंधित महिलेला या गुन्ह्यात पाहिजे आरोपी करण्यात आले असून तिचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४४/२०२६ अन्वये एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिषेक कांबळे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि लोखंडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!