spot_img
spot_img
spot_img

मॅगझीन चौक परिसरात अश्लील प्रकारांवर पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

आळंदी-पुणे रोडवरील मॅगझीन चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास देणाऱ्या दोन महिलांविरोधात दिघी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास आळंदी-पुणे रोडवरील मॅगझीन चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (पो.शि. ३०६३) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करत तसेच अश्लील शब्द उच्चारून त्यांना अडथळा निर्माण करत होत्या.

यातील एका महिलेने, अश्विनी प्रकाश जाधव हिने फिर्यादींच्या अंगावर हात फिरवत अश्लील वर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील सार्वजनिक सभ्यता व शिष्टाचाराचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी महिलांना बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०५/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक (पिटा) अधिनियम १९५६ चे कलम ०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोउनि भोईर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!