spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १ मे महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आज शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिननिमित्त शहराध्यक्ष श्री. योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे व महाराष्ट्र हे अखंड राज्य असून महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे शहीद झाले आहेत त्यांना देखील मी अभिवादन करतो. तसेच कामगार दिनानिमित्त कामगारांचा देखील गौरव होणे आवश्यक आहे. कारण कामगारांनी देशाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. तसेच आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्याला मी मानाचा मुजरा करतो. तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती (बुद्ध पौर्णिमा) निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट तसेच मा.नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमावेळी सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सेवादल कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल, गटनेते भाऊसाहेब भोईर व प्रमुखांच्या हस्ते शहर उपाध्यक्ष पदी चतुर आहेर, शहर कार्याध्यक्ष पदी बाबासाहेब चौधरी, अलंकार हिंगे,अभिजीत आल्हाट, तर भोसरी विधानसभा अध्यक्ष पदी प्रविण पिंजण यांना पद निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ॲड गोरक्ष लोखंडे, मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश मुख्य संघटक सेवादल प्रमोद साळवे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, कामगार सेल अध्यक्ष युवराज पवार, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, वरिष्ठ महिला अध्यक्षा कविता खराडे, खजिनदार दिपक साकोरे, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संपत पाचुंदकर,तुकाराम बजबळकर, भाग्यश्री म्हस्के, दिपक पानसरे, शमा सय्यद, राजीव क्षीरसागर, राजू चांदणे, अलंकार हिंगे, प्रविण पिंजन, अभिजीत आल्हाट, चतुर आहेर, बाबासाहेब चौधरी, सुरविंदरसिंग बाला, दिनकर मिश्रा, कुमार कांबळे, सचिन गायकवाड , राम खरात, सचिन शिंदे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!