spot_img
spot_img
spot_img

तळेगावात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन; महिलेविरुद्ध गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब

तळेगाव दाभाडे येथे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना पुणे–मुंबई महामार्गावरील सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील वडाच्या झाडाखाली २८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.०७ वाजता हा प्रकार घडला.

या प्रकरणी पोलीस हवालदार उदयकुमार भोसले यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित महिलेने वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!